मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन भाजपाने राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामींना अटक केली, त्यानंतर दुपारी अर्णब यांना अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात आलं.अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले.याबाबत आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत राम कदम यांनी सांगितले की, ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली, त्या ९ पोलिसांना तात्काळ निलंबित करा आणि त्यांची चौकशी करावी, पोलिसांबद्दल आदर असला तरी मारहाण योग्य नाही अशी मागणी राम कदम यांनी राज्यपालांकडे केली आहे.