अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाच्या लोकांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. अयोध्येत भूमीपूजन होण्यापूर्वी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये आपला आनंद साजरा केला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहत होता.
आयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याविषयी फक्त देशभरातच उत्साह तर नाही तर परदेशात देखील याचा उत्साह पाहायला मिळत आहे. अयोध्येत भूमिपूजनचा आनंद साजरा करण्यासाठी अमेरिकेत राहणारे भारतीय नागरिक वॉशिंग्टन डीसीमधील कॅपिटल हिलच्या बाहेर जमले होते. यावेळी त्यांच्या हातात भगवा ध्वजही होता. तसेच त्यांनी भगवे कपडे देखील परिधान केले होते. यावेळी त्यांनी छोटेखानी मिरवणूकच काढली होती. यापूर्वी येथील भारतीय समुदायाच्या लोकांनी असे सांगितले होते की, ते या खास प्रसंगी येथील मंदिरांमध्ये विशेष पूजा करतील.
दरम्यान , एकीकडे अयोध्येत भूमिपूजन सोहळा संपन्न सुरु होत असताना दुसरीकडे अमेरिकेत भारतीय नागकिकांनी मिरवणूक काढली होती. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी शिलान्यास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. यापूर्वी न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमधील मोठ्या बिलबोर्डवर भगवान राम आणि भव्य राम मंदिराच्या डिजिटल फोटो प्रदर्शित करण्यात आले होते. याबाबतची माहिती आयोजकांकडून देण्यात आली होती.