मुंबई : निवडणुक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी पक्षनाव आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादी आमदार अपात्र निकालाचं वाचन करत आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट राज्यातील युती सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर दोन्ही बाजूने आमदार अपात्रबाबत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना प्रकरणानंतर आता राष्ट्रवादी प्रकरणाकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
विधानसभेच्या संख्याबळानुसार मी निर्णय देणार आहे. यातच विधानसभेच्या संख्याबळानुसार निर्णय घेतल्यास अजित पवार गटाकडे निर्णय जाण्याची शक्यता आहे. यातच निकालाचं वाचन करतांना त्यांनी नेते पदाची संरचनाही लक्षात घेणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्र याचिकेचा निकाल राष्ट्रवादी पक्ष घटना, नेतेपदाची रचना, विधीमंडळाच्या बहुमतावर पक्ष ठरणार आहे. असं म्हणत ३० जुन रोजी राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून आमदार अपात्रतेबाबत याचिका दाखल करण्यात आल्या. असेही नार्वेकर यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर नार्वेकरांसमोर सुनावणी झाली. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपले. केंद्रीय निवडणुक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मुळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला होता.