पुणे : मावळात अजित पवारांनी श्रीरंग बारणे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी करत कार्यकर्त्यांना देखील खडसावले आहे. यातच काही दिवसांपुर्वी संजोग वाघेरे यांनी अजित पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. त्यानंतर अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी त्या चर्चांना आता पुर्णविराम दिलाय.
हेही वाचा…“मावळात दगाफटका झाल्यास सहन करणार नाही,”अजित पवारांनी कार्यकर्त्यांना ठणकावले
अजित पवार म्हणाले की, काही दिवसांपुर्वी आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलीचा विवाह पार पडला. त्यावेळी मावळचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याविरोधी असणारे सध्याचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे माझ्यावर लक्ष ठेवूनच उभे होते. मी स्टेजवर गेलो अन् गड्याने पाय धरले. फोटो काढला अन् दादांनी आशीर्वाद दिले, असा प्रचार त्यांनी सुरू केला. असे अजित पवार यांनी सांगत आपल्याला बारणेंनाच निवडून आणायचे आहे. असे आवाहन केले.
हेही वाचा..धंगेकरांच्या पाठीमागे लागली साडेसाती, भाजपकडून निवडणुक आयोगात तक्रार दाखल
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, मी शब्दाचा पक्का आहे. एकदा शब्द दिला की, कोणाच्या बापाचं ऐकत नाही. मी मॅच फिक्सिंग करत नाही. असे सांगत आपल्यासंदर्भाने होणाऱ्या चर्चेत काहीही तथ्य नाही. मी एकदा निर्णय घेतल्यानंतर कोणाच्या बापाचे ऐकत नाही, असेही ते म्हणाले. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मावळ तालुक्यातील कामशेत येथे सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते महायुतीचे काम करत असून कार्यकर्ते थोडी गडबड करत आहेत. माझे बारकाईने लक्ष आहे. देश डोळ्यासमोर ठेऊन एकदिलाने काम करायचे आहे. एकमेकांवर ढकला-ढकली करू नका. विरोधात काम करून गालबोट लागू देऊ नका. दगाफटका केल्यास सहन करणार नाही, असे म्हणत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ठणकावले.
READ ALSO :
हेही वाचा…“विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला जाईल,” अजित पवारांनी शिरूरकरांसाठी दिली ग्वाही
हेही वाचा…“पठ्ठ्या तु आमदारच कसा होतो, तेच बघतो,” शरद पवारांच्या नेत्याचा अजितदादांचं चॅलेंज
हेही वाचा…“मुरलीधर मोहोळांच्या रूपाने नरेंद्र मोदींना मत द्या”, पुण्यात फडणवीसांचं मतदारांना आवाहन
हेही वाचा…“पठ्ठ्या तु आमदारच कसा होतो, तेच बघतो,” शरद पवारांच्या नेत्याचा अजितदादांचं चॅलेंज
हेही वाचा…मतदानापुर्वीच धंगेकरांच्या पाठीमागे शुक्लकाष्ठ, साड्यावाटपप्रकरणी समर्थकावर गुन्हा दाखल