मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडाखोरीनंतर शिवसेनेला चांगलीच गळती लागली आहे. आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या 12 खासदारांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या देखील अलीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या आहेत. तर काही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश करायला सुरूवात केली आहे. आज राष्ट्रवादीच्या नेत्या आणि आंबेडकरी चळवळीचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका म्हणून सुषमा अंधारे यांनी काम केलं आहे. तसेच 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून प्रचार करताना त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत सभा गाजवल्या होत्या.
“बाबा तुच आहेस का रे”? अजित पवारांनी केली ‘त्या’ फोटोची शहानिशा
यातच आता बंडखोर खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटीत पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितित हातावर शिवबंधन बांधले आहे. प्रशांत सुर्वे हे व्यवसायाने वैमानिक असून त्यांनी अनेक वर्षे एअर इंडिया आणि इंडिगो विमान कंपनीत वैमानिक म्हणून काम केलं आहे. 2014 साली त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती.
“अजितदादा लवकरच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार”; सचिन खरात
प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चाचपणी केली होती. पण त्यावेळी शिवसेना पक्षात भावना गवळी असल्याने उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी देण्यास नकार दिला होता. पण आता राजकीय परिस्थिती बदलाली आहे. भावना गवळी शिंदे गटात सामील झाल्या आहेत. त्यानंतर प्रशांत सुर्वे यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे. 2013 ला भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे यांचा घटस्फोट झाला होता.
महाराष्ट्राचा बदला, झारखंडने घेतला, भाजपचे 16 आमदार फुटणार? एकच खळबळ
2013-14 साली आपण शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे विचारणा केली असता. उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या मला हे योग्य वाटत नाही. मी पक्षाकडून कोणतीही जबाबदारी देऊ शकणार नाही. त्यावर मी त्यांना आपण म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मला पाठिंबाबाही दिला नाही आणि थांबवलंही नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी माझे खुप वर्षापासूनचे संबंध आहेत. हे संबंध अजुन घट्ट करण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे. येथून पुढे आपण एका शिवसैनिक म्हणुन वाशिम जिल्ह्यासाठी काम करू, असं प्रशांत सुर्वे म्हणाले.
Read also
- मुख्यमंत्र्यांचा निकाल लावला आता पक्षाचाही लावतील; विखे पाटलांचा राऊतांवर निशाणा
- “धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना शोभत नाही, लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका”
- “चुक झाली असेल तर फासावर लटकावा, पण यात सोनिया गांधींना ओढू नका”
- बाळासाहेबांच्या निकटवर्तीयांना आपल्या गटात घेण्याचा शिंदेंचा मोठा प्लॅन; ठाकरेंना धक्क्यावर धक्के
- बाळासाहेबांच्या निकटवर्तीयांना आपल्या गटात घेण्याचा शिंदेंचा मोठा प्लॅन; ठाकरेंना धक्क्यावर धक्के