IMPIMP
Virat Kohli Virat Kohli

“रोहित शर्मा, विराट कोहलींची मिरवणूक मुंबईच्या बेस्ट बसवरून काढा”, रोहित पवारांची मागणी

मुंबई : आंतरराष्ट्रीय टी २० वर्ल्डकपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज भारतात त्यांची जंगी मिरवणुक निघत आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वानखेडे मैदानापर्यंत त्यांची बसमधून मिरवणूक काढण्यात येत आहे. परंतु ती बस गुजरातमधून मागवण्यात आली आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा..इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, अजित पवार गट काय भूमिका घेणार ? 

रोहित पवार म्हणाले की, आमचे खेळाडू चांगले खेळले. आम्ही विश्वचषक जिंकला. भारतीय संघ विश्वचषकासह महाराष्ट्रात मुंबईत येत आहे. मग ही विजयी मिरवणूक महाराष्ट्रातील बसमधूनच खासकरून मुंबईतील बेस्टमधून काढायला हवी. कारण मुंबई शहर प्रवासाच्या बाबतीत अत्यंत सुखद आहे. मग मुंबईत विश्वचषक येत असेल तर बेस्टच्या बसचा वापर केल्यास आम्हाला आनंद होईल.

हेही वाचा..शिंदे अन् ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त भेट, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ 

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, “भारतीय संघाच्या विजयी मिरवणुकीसाठी आलेल्या गुजरातच्या बसला आम्ही पार्किंगसाठी चांगली जागा देऊ. बीसीसीआयने मोठी आणि चांगली बस आणली असेल, पण आमच्या भावना बेस्टसोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे बेस्ट बसचा वापर केला पाहिजे.त्यासाठी आम्ही बीसीसीआयकडे विनंती करू, शेवटी तेच निर्णय घेतील”, असे रोहित पवार यांनी म्हटले.

दरम्यान, मरीन ड्राईव्हवरून मिरवणुक काढल्यानंतर संपुर्ण भारतीय संघाचा वानखेडे मैदानावर गौरव कार्यक्रम होणार आहे. याकडे सर्व क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागले आहे. हजारो मुंबईकर हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे.

READ ALSO :

हेही वाचा…कट्टर विरोधक, लोकसभेला साथ दिली, आता विधानसभेचं वेध, कॉंग्रेस जागा सोडणार का ? 

हेही वाचा…“बहिणीला विधानपरिषद मिळाली, आता भावाला देखील राज्यसभा मिळणार” 

हेही वाचा..“प्राधिकरणाच्या मालमत्ता होणार फ्री होल्ड ;” महेश लांडगे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर सामंताचं उत्तर 

हेही वाचा…“सभागृहात उद्यापासून त्याच आक्रमकतेने …” अंबादास दानवेंचं निलंबन मागे 

हेही वाचा…वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश , विधानसभेसाठी ठाकरेंकडे मोरेंनी दिलेल्या दोन पर्यायात इच्छूकांची प्रचंड गर्दी 

Leave a Reply