मुंबई : मुंबईत रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं आपल्याला एनडीटीव्ही व एबीपीच्या पत्रकारांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. रिपब्लिकचे पत्रकार प्रदीप भंडारी यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. भंडारी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्य बोलण्याची काय किंमत आहे हे बघा असं सांगत एनडिटिव्ही व एबीपीच्या गुंड पत्रकारांनी आपल्याला मारहाण केल्याचं म्हटलं आहे.
एनसीबी कार्यालयासमोर कव्हरेज करताना न्यूज चॅनेलचा पत्रकार दररोज आरडाओरडा करून कव्हरेज करत असत. त्यामुळे इतर न्यूज चॅनेलच्या पत्रकारांना लाईव्ह आणि कव्हरेज करताना अनेकदा अडचणी आल्या. त्यातच आज कव्हरेज सुरू असताना एका न्यूज चॅनेलच्या पत्रकाराने मुंबईकर पत्रकारांना चाय बिस्कुट खाणारे गरीब पत्रकार असे हिनवले, त्यामुळे मुंबईकर पत्रकार संतापले आणि दिल्लीहून आलेल्या एका न्यूज चॅनेलच्या आरडाओरडा करणाऱ्या पत्रकाराला धक्काबुक्की केली. त्यावेळी मुंबई पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद सोडवण्याच्या प्रयत्न केला.
ड्रग्स प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सिमॉन खंबाटाची गेल्या अनेक तासांपासून चौकशी सुरू आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच सर्व पत्रकार एनसीबी कार्यालयासमोर जमले होते. यावेळी पत्रकारांना बातमी कव्हर करण्यासाठी देण्यात आलेल्या जागेवर उभं राहण्यावरून दोन पत्रकारांमध्ये वाद झाला. शिवाय एका चॅनेलचा पत्रकार तर आरडाओरडा करत बातमी कव्हर करत होता. त्याने इतरांना कव्हरेज करताना व्यत्यय येत होता. त्यामुळे संतापलेल्या पत्रकारांनी या पत्रकाराला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केल्याने एनसीबीच्या कार्यालयाबाहेर वादाचे चित्र उभे राहिले, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. या वादाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
जानते है महाराष्ट्र में सच बोलने की क़ीमत क्या है?
कार्टेल के नामी-गिरामी चेहरे जैसे-जैसे एक्सपोज़ हो रहे है, उनका ग़ुस्सा और बढ़ता जा रहा है।जब पुलिस से भी काम नहीं बना तो आज NDTV और ABP के गुंडे पत्रकारों को मेरे पास हाथपाई करने भेज दिया। लेकिन मैं टूटने वालों में से नहीं हूँ। pic.twitter.com/z2fvH2KkUK— Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी) (@pradip103) September 24, 2020