पुणे : पुण्यातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विविध स्तरामधून जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. यातच आता मुरलीधर मोहोळ यांना शहरातील ऑस्कॉप, फेसकॉम, भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडी आणि पुणे शहरातील सर्व १९० अंगीकृत ज्येष्ठ नागरिक संघांनी आपल्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याबाबत ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती असं म्हणत मोहोळांनी त्यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा…आढळरावांच्या पाठबळासाठी मंचरकर एकत्र, म्हणाले, आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र..
गेल्या अनेक दिवसांपासून मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतली आहे. यातच आता त्यांना ज्येष्ठ नागरिकांचाही पाठिंबा मिळत आहेत. यावर बोलतांना ते म्हणाले की, ज्येष्ठांचा सन्मान करणे ही आमची संस्कृती असून मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, यावर आमचा भर असेल. शिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या अपेक्षाही जाणून घेतल्या. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यास माझे प्राधन्य राहील, असेही सांगितले.
दरम्यान, यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या ॲस्कॉप संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, कार्याध्यक्ष श्रीराम बेडकीहाळ, कोषाध्यक्ष अच्युत कुलकर्णी, सचिव ऊर्मिला शेजवलकर, तसेच उदय रेणूकर, अरुण रोडे, राजीव कुलकर्णी या पदाधिकाऱ्यांनी मेळावा आयोजनात मोलाची भूमिका बजावली. हेल्पेज इंडिया संघटनेचे वसंतराव दापोरकर, बंडोपंत फडके, अनिल कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी, सुरेखा पेंडसे, ऊषा जोईल, श्रद्धा चिटणीस इत्यादी यावेळी उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…“आढळरावांना मोठे मताधिक्क मिळवून देणार”, मनसेच्या कार्यकर्त्यांचा वाघोलीत निर्धार
हेही वाचा…तुतारी चिन्हावरून बारामतीत मोठा घोळ ? शरद पवार गटाची थेट निवडणुक आयोगात धाव
हेही वाचा…“तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला द्यावी लागेल”, शरद पवारांनी दिला मोठा इशारा