पुणे : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. अनेकजण त्यासाठी त्यांना मागण्या, सूचना आणि मार्गदर्शन करीत असतात. तेही याची सकारात्मक पद्धतीने दखल घेतात. आताही त्यांनी बुलडाण्यातील एका शेतकऱ्याला आश्वस्त केले आहे.
शेतकरी अनिरुद्ध धोटे यांनी रोहित पवार यांना ट्विटरवर म्हटले होते की, दादा आपल्या एग्रीकल्चर डेवलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. जेणेकरून आमच्या येथे पण शेतकरी शेती अजुन चांगल्या पध्दतीने शेती करेल. धोटे यांनी आपली मनातील भावना आशेताकारी हिताची गरज ट्विटर पोस्टद्वारे मांडली होती.
रोहित पवार यांनीही त्याला सकारात्मक उत्तर देताना म्हटले आहे की, याबाबत नक्की काहीतरी करूया. पुढील महिन्यात भेटून यावर चर्चा करू. तिथल्या स्थानिक सामाजिक संस्थांना सोबत घेऊन काय करता येईल, याचा विचार करू
याबाबत नक्की काहीतरी करूया. पुढील महिन्यात भेटून यावर चर्चा करू. तिथल्या स्थानिक सामाजिक संस्थांना सोबत घेऊन काय करता येईल, याचा विचार करू. https://t.co/pe8xXvZgrO
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 12, 2020
Read Also
आरक्षण लागू होईपर्यंत मराठ्यांसाठी ‘या’ विशेष योजना लागू कराhttps://t.co/DRRyHR1RMe@Chh_Udayanraje @bjp4mumbai @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 12, 2020