मुंबई : जानेवारीपासून भारतात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोना योद्धांना म्हणजेच आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर 60 वर्षांपुढील वयोवृद्धांना लस दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बँक कर्मचाऱ्यांना देखील प्राधान्याने लस द्यावी अशी मागणी केली आहे.
कोरोना काळात बँक कर्मचाऱ्यांनी देखील कोरोना योद्धा म्हणून काम केले, त्यामुळे त्यांनाही लस देण्यात यावी, असे रोहित पवार म्हणाले.
राज्य आणि देशातील सर्वच बँक कर्मचाऱ्यांनी पहिल्यापासून कोरोना योद्धे म्हणून प्रभावी काम केलं. त्यामुळं ते सुरक्षित रहावेत व बँकिंग सेवा सुरळीत रहावी म्हणून या कर्मचाऱ्यांचंही प्राधान्याने लसीकरण करण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने नियोजन करावं, ही विनंती!@PMOIndia@CMOMaharashtra
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 13, 2021
राज्य आणि देशातील सर्वच बँक कर्मचाऱ्यांनी पहिल्यापासून कोरोना योद्धे म्हणून प्रभावी काम केलं. त्यामुळं ते सुरक्षित रहावेत व बँकिंग सेवा सुरळीत रहावी म्हणून या कर्मचाऱ्यांचंही प्राधान्याने लसीकरण करण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने नियोजन करावे, असे ट्विट करत रोहित पवारांनी विनंती केली आहे.
दरम्यान, सध्या देशात देशात कोव्हिड-19 लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, ज्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक आणि 45 ते 59 वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस दिली जात आहे.