अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचं पाकिस्तानने कबूल केले आहे. आता दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींकडे मागणी केली आहे.
Now that Pakistan has accepted Dawood Ibrahim is indeed in Karachi, I would request Hon'ble PM @narendramodi ji to do everything possible for bringing him to justice.
Let's get him on Indian Soil at any cost.— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 23, 2020
भारताविरोधात कारवाया करण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद पोसत असल्याचे सातत्याने समोर येऊ लागल्याने पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एफएटीएफचे निर्बंध टाळण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरू आहे. दरम्यान, 1993 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानमध्येच लपून बसला असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानने शनिवारी प्रथमच दिली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ‘दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा’ अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ‘पाकिस्तानकडून नवे निर्बंध घातले जात आहेत, अशा बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत. मात्र यात अजिबात तथ्य नाही. काही कुख्यात व्यक्तींचं (दाऊद इब्राहिम) वास्तव्य देशात असल्याची कबुली पाकिस्तानने दिल्याचं वृत्त भारतीय माध्यमांनी दिले आहे. या वृत्ताला कोणताही आधार नाही,’ असं स्पष्टीकरण पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे.