मुंबई : हाथरस येथिल घटनेमध्ये पोलीस आणि प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, देशभरातून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेद व्यक्त करत आपल्याला रामराज आणायचं आहे की गुंडाराज आणायचं आहे असा सवाल उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारला होता.
या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन झोपी गेलेल्या उत्तर प्रदेश सरकारला जाग येण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुमारे १० हजार पत्रे पाठवण्यात येणार असल्याची माहिती रूपालीताई यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
हाथरस येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करावा तितका कमी आहे.या घटनेने योगी आदित्यनाथ यांच्या राज्यासह देशातील तरुणी,महिला यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.या घटनेची निःपक्ष चौकशी करून तसेच आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत तरुणीला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दहा हजार पत्रे पाठवण्यात येणार आहेत.
यासाठी पंतप्रधान @narendramodi जी,गृहमंत्री @AmitShah आणि यूपीचे मुख्यमंत्री @myogiadityanath यांना संपूर्ण राज्यातून राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने 10 हजार पत्र पाठवण्यात येणार आहेत.(2/3)#JusticeForHathrasVictim#justice_for_manishawalmiki @NCPspeaks @PawarSpeaks
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 30, 2020
काय घडले नेमकं हाथरसमध्ये
हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. हाथरसच्या गावातील चार तरुणांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी तरुणीला मारहाण केली आणि तिची जीभ कापली. तिची गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्नही केला. यामध्ये तिला गंभीररित्या दुखापत झाली असून अलीगढच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणालाही सांगून नये म्हणून तिची जीभ कापण्यात आली होती.
Read Also
कधी थांबणार हे सगळं ? खासदार सुप्रिया सुळे यांनी हाथरस आणि बलरामपूर घटनेबद्दल व्यक्त केला संतापhttps://t.co/BnL77txDFF#SupriyaSule #NCP @supriya_sule
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020