IMPIMP
Rohit Sharama Viral kolhi Rohit Sharama Viral kolhi

“रोहित शर्मासह, सुर्यकुमार यादव, जैस्वाल, दुबेंचा सत्कार,” द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना आतातरी सुबुद्धी येवो

मुंबई : विश्वविजेता ठरलेल्या भारतीय क्रिक्रेट संघांचं काल मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तब्बल १७ वर्षानंतर भारताकडे विश्वचषक आल्याने अवघ्या देशभरातून आनंद व्यक्त केला गेला. यानिमित्ताने भारतीय संघासाठी मुंबईत मरिन लाईन ते वानखेडे स्टेडिअम दरम्यान विजयी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी गुजरातमधून बस आणण्यात आली होती. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टिका केली. तर मुंबईतील चार खेळाडूंचा आज विधानसभेत सत्कार करण्यात येणार असून त्यांना प्रत्येकी एक कोटी रूपयांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं आहे. यावरून आता कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मोठं विधान केलं आहे.

हेही वाचा…“सभागृहात उद्यापासून त्याच आक्रमकतेने …” अंबादास दानवेंचं निलंबन मागे 

सचिन सावंत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देशाला गौरव मिळवून देणाऱ्या आपल्या लाडक्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या मुंबईकरांचा सत्कार करण्यात येणार आहे. याचा आनंद आहे. समस्त मुंबईकर काल या आपल्या हिरोंच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते आणि सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. या मुंबईच्या सुपुत्रांपैकी सूर्यकुमार यादव याचा जन्म गाझीपूर उत्तर प्रदेश आणि यशस्वी जैस्वाल याचा जन्म भदोई, उत्तर प्रदेश चा आहे. मुंबई स्वप्ननगरी आहे. यशस्वी चे यश हे ज्यांचा काही राजकीय पक्ष तिरस्कार करतात त्यांच्यापैकी एका फेरीवाल्याच्या स्वप्नांची पूर्ती आहे. शिवम दुबे याचा जन्म मुंबईत झाला असला तरी त्याचे वडील हे भदोई उत्तर प्रदेश चे आहेत. मराठी उत्तम बोलणाऱ्या आपल्या लाडक्या रोहितची मातृभाषा तेलगू आहे.

हेही वाचा…वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश , विधानसभेसाठी ठाकरेंकडे मोरेंनी दिलेल्या दोन पर्यायात इच्छूकांची प्रचंड गर्दी 

मुंबईच्या विकासासाठी व मुंबईचे नाव जगात मोठे करण्यासाठी मराठी माणसाच्या खांद्याला खांदा लावून इतर प्रांतातील लोकांनीही योगदान दिले आहे. तेही मुंबईकर आहेत याचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे. आम्हाला तो आहेच! मुंबईकरांमध्ये मराठी परप्रांतीय असे ध्रुवीकरणाचे, द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना आतातरी सुबुद्धी येवो! जे अशा पक्षाची सत्तेसाठी साथ घेतात अशा भाजपालाही सुबुद्धी प्राप्त होवो हीच या आनंदाक्षणी प्रार्थना! असंही सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काल विधानसभेत भाजपचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विश्वविजेता ठरलेल्या चार मुंबईकरांचा सन्मान करण्यात यावा, यासाठी प्रस्ताव मांडला. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी या मुद्दा सभागृहात मांडला. त्यानंतर आज सायंकाळी त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याचबरोबर राज्य सरकारकडून या चार खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

READ ALSO :

हेही वाचा…पुण्यात झिका व्हायरसचा धुमाकुळ, श्रीनाथ भिमालेंनी आयुक्तांना लिहिले पत्र 

हेही वाचा…“रोहित शर्मा, विराट कोहलींची मिरवणूक मुंबईच्या बेस्ट बसवरून काढा”, रोहित पवारांची मागणी 

हेही वाचा…कट्टर विरोधक, लोकसभेला साथ दिली, आता विधानसभेचं वेध, कॉंग्रेस जागा सोडणार का ? 

हेही वाचा…“बहिणीला विधानपरिषद मिळाली, आता भावाला देखील राज्यसभा मिळणार” 

हेही वाचा..“प्राधिकरणाच्या मालमत्ता होणार फ्री होल्ड ;” महेश लांडगे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर सामंताचं उत्तर 

Leave a Reply