ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा पार पडणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत राज्यात प्रचंड गदारोळ माजला होता. त्यामुळे या सभेत विरोधकांनासह सत्ताधारी तसेच संपुर्ण राजकीय नेत्यांना या सभेतुन उत्तर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता ठाण्यातील सभेतील थेट प्रेक्षपण जम्मू काश्मीरमध्ये देखील करण्यात येणार आहे. यासंबंधी काश्मीर पंडितांनी पोस्टर लावले आहेत. तर ठाण्यातील या सभेत मनसे नेते सलिम मामा शेख यांनी माझा नेता कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हता असं म्हटलं आहे.
माझा DNA चेक करण्यात आला परंतु मी आज सांगतो की पैंगबरांच्या विचारांचा माझा डीएन. छत्रपतींच्या विचाराचा ,संविधान देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या, बलिदान केलेल्या वीरांचा आहे. मी काही भाषण करण्यासाठी आलो नाही. माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आलो आहे 2 तारखेला पाडव्याला चित्र बदललं गेलं. प्रसारमाध्यामांची लोकं आमच्याशी संपर्क साधत होती. प्रतिक्रिया जाणून घेत होती. आम्ही त्यावर बोललो कीस जगाला शांतीचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैंगबर यांच्या विचारांचा माझा डीएऩ आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
कधी कधी एवढ्या मोठ्या सभेसमोर बोलू नये. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की, 2012 साली नाशिक पालिकेत आमची सत्ता होती . तेव्हा माझी जात न बघता मला सभागृह समितीसाठी सभापती केलं गटनेता केलं माझा कधीही मुसलमानांच्या विरोध नव्हत आणि कधीही राहणार नाही. अंसही ते म्हणालेत.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेचं काश्मीर पंडितांनी पोस्टर लावले आहेत. त्या पोस्टरवर काश्मिर पंडितांच्या काश्मीर पंडित ग्रुप, हॉटेल रिजन्सी काटरा असं लिहिलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांचा मोठा फोटो देखील लावण्यात आला आहे. त्यावर हिंदुजननायक राजसाहब ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी घोषणा लिहिली आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे काय बोलणार? त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.