IMPIMP
Sandeep Deshpande against Aditya Thackeray," MNS demands '20' seats from Grand Alliance Sandeep Deshpande against Aditya Thackeray," MNS demands '20' seats from Grand Alliance

“आदित्य ठाकरेंच्या विरोधात संदीप देशपांडे,” ? मनसेची महायुतीकडे ‘२०’ जागांची मागणी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मनसेने बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसेचा कमी अधिक फायदा झाल्याचे दिसून आले. यानंतर आता विधानसभेत देखील मनसेला सोबत घेण्यावर महायुतीकडून लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच मनसेने विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून २० जागांचा प्रस्ताव देखील पाठवला असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा…मंचरमध्ये महाविकास आघाडीत मोठा राडा, कोल्हेंनी निकमांचा ‘भावी आमदार’ उल्लेख केला अन्… 

लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने त्याचा फायदा पुणे, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, ठाणे, कल्याणमध्ये झाल्याचे दिसून आले. यानंतर आता विधानसभेत देखील महायुती मनसेला सोबत घेणार असल्याचे समजत आहे. यावरून आता जागावाटपाबाबत भाजप-मनसे यांच्यात चर्चा सुरू असल्याचं पुढे आलं आहे. त्यात मनसेनं राजयातील २० जागांची मागणी केलीय.

हेही वाचा…भाजप विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार ? अजित पवार अन् शिंदेंचं काय होणार ? 

मनसेने महायुतीकडे केलेल्या मागणीत बहुतांश जागा मुंबई आणि ठाणे परिसरातील आहेत. या २० जागांमध्ये वरळी, माहिम-दादर, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पुर्व, वणी, पंढरपुर, छत्रपती संभाजीनगर मध्य आणि पुण्यातील एका जागेचा समावेश आहे.

यातच मनसेकडून वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. तर नितीन सरदेसाई माहिम-दादर, शालिनी ठाकरे वर्सोवातून निवडणूक लढू शकतात.

READ ALSO :

हेही वाचा..“राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सांभाळणे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पं नाही”, राष्ट्रवादीतील अंतर्गत शितयुद्ध चव्हाट्यावर

हेही वाचा..शपथविधी झाला, खातेवाटपही झालं, आता पहिलं अधिवेशन २४ जूनपासून.. वादळी ठरणार ?

हेही वाचा..“मोदी है तो मुनकीन है, मोदी की गॅरंटी”, असं वातावरण तयार केलं, पण घडलं काय ?” शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

हेही वाचा…“कोकण आणि नाशिकबाबत समझोता झालाय”, विधान परिषदेच्या जागांचा घोळ ठाकरेंनी निकाली काढला 

हेही वाचा..अजित पवार गटाकडून राज्यसभेवर सुनेत्राताई पवार, की पार्थ पवार, की तिसरा कोणीतरी?