सांगली : देशासह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज 90 हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहे. राज्यातील लोकप्रतिनिधींना देखील याची लागण होत आहे. सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली.
तरी माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी.
आपल्या सर्वांच्या आशीर्वादांनी व सदिच्छानी
मी लवकरच आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईन.— Sanjaykaka Patil (@PatilSanjaykaka) September 7, 2020
संजयकाका पाटील यांनी सांगितेल की, काही प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्यावर मी माझी कोरोना चाचणी करून घेतली. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली आहे. सोबतच त्यांनी गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील 7 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपुर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली जिल्ह्यावर होते. यावेली संजय काका पाटील त्यांच्यासोबत होते.