पुणे – आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माजी खासदार संजय काकडे(Sanjay Kakade) यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. हे पद हातात घेताच संजय काकडे हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत (Chief Minister uddhav thackarey) मोठं विधान केलं आहे. मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो. त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे. आज ना उद्या ते नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असं मोठं विधान संजय काकडे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Sanjay Kakade targeted the Chief Minister and made a big statement)
संजय काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे मोठं विधान केलं आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत, असं संजय काकडे म्हणाले. शिवसेना गेली 25 वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते, असंही ते म्हणाले.