IMPIMP
sanjay-raut-has-said-that-a-second-movie-started-in-the-state-and-the-movie-will-end-the-same-way sanjay-raut-has-said-that-a-second-movie-started-in-the-state-and-the-movie-will-end-the-same-way

“राज्यात एक दुजे के लिए सिनेमा सुरु, सिनेमाचा अंत ही तसाच होईल”

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षाचे नेते जोरदार टीका करतांना दिसत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच राज्याचे मालक असून तेच सर्व निर्णय घेत आहेत असा टोलाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला होता. या पार्श्वभूमीवर आता राज्यात एक दुजे के लिए सिनेमा सुरू आहे. असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी देखील त्यांची खिल्ली उडवली आहे.

आमदार महेश लांडगे- महापालिका आयुक्तांची मॅरेथॉन बैठक 

राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजकारणात एक दुजे के लिए हा सिनेमा सुरु आहे. एक दुजे के लिए सिनेमाचा अंत काय होता,  हे सर्वांना माहित आहे. चित्रपटाची कथा समजुन घ्या. महाराष्ट्रातील एका बीजेपी नेत्यावर सिनेमा सुरू आहे. त्याचा राजकीय अंतही त्याच पद्धतीने होईल. सगळ्यांनी राजकीय आत्महत्या केलेल्या आहेत. असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांनी लगावला आहे.

“सगळे कपडे काढून घ्यायचे आणि त्याला लंगोट द्यायची”; करकपातीवरून भुजबळांची सरकारवर टिका 

याबरोबरच, बेईमान हा शेवटपर्यत सांगत असतो की मी बेईमान नाही आणि आपल्या बेईमानीची करणे देत असतो. पण तुम्ही शिवसेना सोडलेली आहे आणि शिवसेनेचा वापर करून शिवसेनेच्या नावाखाली माधुकरी मागू नका. तुम्ही तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करा. तुमचा स्वतंत्र संसार मांडा. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पंखाखाली जगू नका, असा सल्ला ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना दिला आहे.

“त्यामुळे मी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता”; केसरकरांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर 

दरम्यान, नामांतराच्या मुद्दाबाबत बोलताना म्हणाले की, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्यांनी आता औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर का भांबवलं ? औरंगजेब हा सरकारचा नातेवाईक कधीपासुन झाला? मुळात असा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. सुप्रिम कोर्टाची टांगती तलवार सरकारवर आहे. त्यामुळे काही काम नसल्यामुळे हे सरकार निर्णयांना स्थगिती देत सुटले आहेत. अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

Read also