मुंबई – शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राऊत यांनी स्वत: ट्विटरवर या भेटीबाबत माहिती दिली आहे
“आदरणीय शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचा कामाचा उरक आणि उत्साह थक्क करणारा आहे. संकट आणि असंख्य वादळात त्यांचे नेतृत्व खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. नक्कीच आणि निश्चित”, असं संजय राऊत ट्विटरवर म्हणाले.
आदरणीय शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचा कामाचा उरक व उत्साह थक्क करणारा आहे. संकटे व असंख्य वादळात त्यांचे नेतृत्व खंबीरपणे ऊभे आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पुर्ण करेल. नक्कीच आणि निश्चित.— Sanjay Raut (@rautsanjay61) November 30, 2020
संजय राऊत आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे. नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप उघडकीस आलेले नाही. तसेच सहर्ड पवार आणि समाज राऊत यांच्या वर्चावर भेटी होत असतात. पण या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे पाहणे मात्र महत्वाचे ठरणार आहे.