विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याना कोरोनाची लागण झाली असून ते सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. फडणवीसांना कोरोना झाल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त करत आहे. फडणवीसांची त्यांनी प्रार्थना देखील केली आहे.
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्यानं दौरे करत आहोत. त्यांना काळजी घेण्याचा सल्ला आम्ही दिला होता. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. परिस्थिती किती गंभीर आहे हे आता त्यांना समजलं आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी आम्ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो”, असे संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची काळजी घेण्याचा सेंट जॉर्ज रुग्णालयाला सूचना दिल्या असल्याची माहिती राऊत यांनी दिली. देवेद्रं फडणवीसांनी शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. सरकार त्यांची पूर्ण काळजी घेईल, असंही राऊत म्हणाले.
दरम्यान संजय राऊत यांनी आजचा दसरा मेळाव्याबाबत देखील भाष्य केले आहे. आजच्या मेळाव्याचे स्वरूप कसे असेल याबाबत त्यांनी माहिती दिली असून यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकेबाजी केली आहे.