IMPIMP
Sanjay Raut suggested the name of these leaders as the face of Mahavikas Aghadi for the post of Chief Minister Sanjay Raut suggested the name of these leaders as the face of Mahavikas Aghadi for the post of Chief Minister

“महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून…” संजय राऊतांनी ‘या’ नेत्यांचं सुचवलं नाव ?

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुक महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर न ठेऊन लढवणार असं ठरलं होतं. परंतु महाविकास आघाडीनं एकत्रिपणे घेतलेल्या निर्णयाच्या विपरीत वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलं आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यातच संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे मोठी मागणी केली आहे.

हेही वाचा…विधानसभेत पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरण बदलणार, शहरात इच्छुकांची मोठी भाऊगर्दी 

यावेळी संजय राऊत म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनही झालेलं आहे. अर्थातच तिघांचीही ताकद एकत्र होती. पण बिन चेहऱ्याचं सरकार, हे अजिबात चालणार नाही. लोक स्विकारणार नाहीत. लोकांना चेहरा द्यावाच लागेल असंही राऊतांनी म्हटलंय.

हेही वाचा…विधानसभेआधीच महायुतीत कुरबुरी अन् कटकटीची ठिणगी, पुण्यात राजकीय घडामोडींना वेग 

दरम्यान, मागील काही दिवसापुर्वी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत एक विधान केलं होतं. सध्यातरी मुख्यमंत्री कोण होईल? हे बाजूला ठेऊन. आधी राज्यातील सत्ता हाती घेणं महत्वाचं आहे. असं जयंत पाटलांनी म्हटलं होतं. तर कॉंग्रेसच्या नेत्यांनीही यावर काही विधाने केली होती. यातच आता राऊतांनी ठाकरेंचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी ठेऊन निवडणुका लढवा. अशी मागणी केली आहे.

READ ALSO :

हेही वाचा…राहुल गांधींनाही पंढरपुरच्या विठ्ठलाची ओढ, वारकऱ्यांसोबत दिंडीत पायी चालणार ? 

हेही वाचा…महाविकास आघाडीत कॉंग्रेसचच मोठा भाऊ, विधानसभेत कॉंग्रेस १०० जागा लढवणार ? इतरांना किती ? 

हेही वाचा…“उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन”, उद्धव ठाकरेंनी डिवचलं 

हेही वाचा..मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडी निवडणुक लढणार, विधानसभेसाठी मेगा प्लॅन ठरला 

हेही वाचा..हडपसरमध्ये शरद पवारांचा उमेदवार फिक्स, मात्र कॉंग्रेस अन् ठाकरे गटाने दावा ठोकल्यानंतर वाद चिघळणार 

Leave a Reply