मुंबई : ड्रग्स प्रकरणावरून संपूर्ण चित्रपटसृष्टीला आरोपीच्या पिंजऱ्या उभ्या करणाऱ्या काही कलाकारांवर खासदार जया बच्चन यांनी काल संसदेमधून टीकेची झोड उठवली होती.त्यानंतर कंगना राणावतने थेट जया बच्चन यांना प्रश्न विचारात ट्विट केले हुते.
मात्र जया बच्चन यांच्या विधानाचे समर्थन करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कंगनावर नाव न घेता निशाणा साधला आहे. आपल्या इंडस्ट्रीला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. काही परंपरा आहेत मात्र काही दिवसांपासून काही लोक इंडस्ट्रीच्या बाबत काही वाईट गोष्टी आणि विचारात पसरवत असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
असे काही इंडस्ट्रीबाबत बोलणारे लोक हे केवळ इंडस्ट्रीला नाही तर देश आणि इथल्या संस्कृतीला देखील बदनाम करत असल्याचे परखड मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राज्यसभेच्या कालच्या अधिवेशनादम्यान खासदार जया बच्चन यांनी इंडस्ट्रीबाबत काही लोक वाईट बोलून इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत व्यक्त केले होते.
Read Also
कंगना खोटारडी! हिमाचलमधील प्रश्न सोडवण्याचे कष्ट तिने घेतले का ? – उर्मिला मातोंडकर
https://t.co/pOKH6aaU4t#urmilamatondkar #marathinews #kanganaranaut #politicalmaharashtra@UrmilaMatondkar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 16, 2020