डॉक्टर आणि कंपाउंडर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत आता यु टर्न घेतले आहे. “कोरोना काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही,” असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समस्त डॉक्टरवर्गाची डॉक्टरांबद्दल अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा मी कंपाऊंडवकडून औषधे घेतो, असे वक्तव्य केले होते. डॉक्टरपेक्षा कंपाउंडरला जास्त कळते, मी तर नेहमी कंपाउंडरकडून औषध घेतो. डब्ल्यूएचओला काय कळते, सीबीआयसारखेच आहे ते, इकडून तिकडून माणसे गोळा केलेली असतात, डब्ल्यूएचओच्या नादाला लागले म्हणून जास्त कोरोना वाढला, अशा प्रकारची वक्तव्य राऊत यांनी त्या कार्यक्रमात केल्यानंतर, राज्यातील डॉक्टर वर्गात मोठी नाराजी पसरली. आयएमएने राऊत यांच्या वक्तव्यानंतर नाराजी व्यक्त करत, राऊत यांनी डॉक्टरांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
राज्यातील डॉक्टरांचा नाराजीचा सूर लक्षात येताच, संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केले आहे. मी जागतिक आरोग्य संघटनेबद्दल बोललो, याचा अर्थ येथील डॉक्टरांचा अपमान केला असे होत नाही, डॉक्टरांचा मी नेहमीच सन्मान केला आहे. मी जागतिक आरोग्य संघटनेबद्दल बोललो, मीच काय, ट्रम्प, रशिया किंवा अन्य देशांनीही जागतिक आरोग्य संघटनेवर बोट ठेवल्याचे म्हणत संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा मतितार्थ पटवून देण्याचा प्रयत्न केला.