सोशल मीडियावर सध्या एका काकूंचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये महिला काही तरुणांना तिच्या कामाचे 1800 रुपये मागत आहे. ते तरुण तिला 1800 रुपये दिला असल्याचे जीव तोडून सांगत आहे. मात्र, तरीही ती महिला ऐकायला तयार दिसत नाही. सदर तरुणांनी महिलेला पाचशे रुपयांच्या तीन नोटा आणि दोनशे रुपयाची एक नोट आणि शंभरची एक नोट, असे अठराशे रुपये दिलेत. महिलेला सुद्धा हे मान्य आहे. तरीही लक्षात न येता महिला पुन्हा त्यांच्याकडून पैसे मागते.
आता या व्हायरल व्हिडीओचा वापर राजकीय आखाड्यात टीका करण्यासाठी देखील केला जात आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्हिडीओ शेअर करत अप्रत्यक्षरित्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला आहे.
निर्मला काकू, अर्थतज्ञांशी जीडीपी ठरवण्याच्या पध्दतीबाबत चर्चा करतांना…
via what's app. pic.twitter.com/w04v8c70VB
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) August 30, 2020
सत्यजित तांबे यांनी ट्विट केले की, निर्मला काकू, अर्थतज्ञांशी जीडीपी ठरवण्याच्या पध्दतीबाबत चर्चा करताना. त्यांचे हे ट्विट देखील चांगलेच व्हायरल होत आहे.