मुंबई : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी काँग्रेसच्या गोटात चार जागा आहेत. त्यापैकी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांचं नाव चर्चेत आहे. त्याबरोबरच नसीम खान, रजनी पाटील आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नावाचीही चर्चा आहे.
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड लवकरच होणार आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य नावांची यादी समोर आलीय. यामध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होतेय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील उमेदवारांच्या नावावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊ शकते
सत्यजित तांबे यांचे वडीलही विधान परिषदेवर
सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे हे सुद्धा विधान परिषदेचे आमदार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळं सत्यजित तांबे यांना काँग्रेसनं संधी दिल्यास बाप-लेक एकाच वेळी विधान परिषदेच्या बाकावर बसलेले पाहायला मिळू शकतात.
Read Also
विधानपरिषदेसाठी राजू शेट्टींना दिलेला शब्द राष्ट्रवादी पाळणार ! उमेदवारीसाठी 'या' नावांवर निश्चितीhttps://t.co/4mvxat5mFm#SharadPawar #Rajushetty #AanandShinde #ncp
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 14, 2020