मुंबई : मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली असून, या भेटीनंतर राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. एकीकडे मनसे अनेक मागण्यांसाठी सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. अशात या बैठकीनेत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
बाळा नांदगावकर आणि यशवंत जाधव यांच्यात रब्बरवाला हाऊस इथं ही बैठक पार पडली. या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याची माहिती मात्र समोर आली नाही.
मागील काही दिवसांपासून मनसे वाढीव वीज बिल, लोकल सेवा, मंदिरे उघडण्यासंदर्भात आक्रमक झाले आहे. अशातच आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.