IMPIMP
Sabtisg Bangar with Abdul Sattar Sabtisg Bangar with Abdul Sattar

शिंदे अन् ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त भेट, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. यातच हिंगोलीसह संपुर्ण मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी गुप्त भेट घेतली आहे. या तिघांच्या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या भेटीमागे आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तवू लागले जात आहेत.

हेही वाचा..“आधी धमकी नंतर दिलगिरी,” अंबादास दानवेंचं सभापतींना पत्र 

अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने विद्यमान खासदार असलेल्या हेमंत पाटलांना डावलून बाबुराव कोहळीकर यांना तिकीट देण्यात आलं. तर सुरूवातीपासून हेमंत पाटलांसाठी प्रचार करत असलेले संतोष बांगर त्यानंतर बाबुराव कोहळीकर यांच्यासाठी प्रचार करू लागले. याचदरम्यान मंत्री अब्दुल सत्तार कुठल्याही प्रचारात दिसले नाहीत.  परंतु या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी कोहळीकरांचा मोठा पराभव झाला.

हेही वाचा..अमोल कोल्हेंना शरद पवार गटाकडून मोठं गिप्ट, पक्षाने दिली मोठी जबाबदारी 

यातच आता एकमेकांच्या विरोधात लढलले नागेश पाटील आष्टीकर, संतोष बांगर आणि अब्दुल सत्तार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर अब्दुल सत्तार हे जिल्ह्याचे पालकमंत्री असून नागेश पाटील आष्टीकर त्यांच्या कामासाठी आले होते. मी देखील त्याठिकाणी गेलो. आमच्यात चहापान झालं अन् आम्ही तेथून निघून गेलो. असं म्हणत हा फक्त योगायोग होता अशी प्रतिक्रिया संतोष बांगरांनी त्यानंतर दिली आहे.

दरम्यान, यातच राज्यात सध्या पुढे विधान परिषदेची निवडणुक होत आहे. त्याचबरोबर काही महिन्यानंतर विधानसभेचीही निवडणुक होऊ घातली आहे. यातच ठाकरेंनी अतिरिक्त उमेदवार म्हणून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर सध्या शिवसेना शिंदे गटात अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच अनुषंगाने अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी झालेली भेटीवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

READ ALSO :

हेही वाचा..पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला गळती सुरूच, अजित पवारांनी आणखी एक धक्का 

हेही वाचा…पर्वतीमध्ये भाजपच्या नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच, श्रीनाथ भिमाले की माधुरी मिसाळ ? एकच चर्चा

हेही वाचा…जरांगे पाटलांच्या जीवाला धोका, झेड प्लस सुरक्षा देण्याची मराठा बांधवांची मागणी 

हेही वाचा…“मिलिंद नार्वेकरांमुळे कॉंग्रेसचा उमेदवार पडणार”?शिंदे गटातील आमदाराचा मोठा दावा 

“अजितदादा माझे चांगले मित्र, सरकार यावं अन् मी मंत्री व्हावं,” विजय शिवतारेंचं विधान 

Leave a Reply