IMPIMP
sharad pawar Mumbai sharad pawar Mumbai

“राष्ट्रवादी कुणाची याचं उत्तर जनतेनं दिलं,” शरद पवारांनी अजित पवार गटाला दिलं सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई : राज्यात आता आगामी काही महिन्यात विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरू होणार आहे. त्याआधी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आरोपांच्या चांगल्याच फैरी झडतांना दिसत आहेत. यातच संसदेत अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी ओरिजन राष्ट्रवादी असा उल्लेख केला. त्यावर शरद पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. तर आज शरद पवारांनी सुनील तटकरे यांना सणसणीत टोला लगावला.

हेही वाचा..“हेमंत सोरेन यांच्या १४९ दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला”, शरद पवारांनी एनडीए सरकारकडे केली ‘ही’ मागणी 

शरद पवार सध्या कोल्हापुर दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी ते बोलतांना म्हणाले की, ते कळलं ना आता. लोकांनी सांगितले ते. एक माणूस तिकडेन निवडून आला आणि आम्ही १० पैकी ८ निवडून आलो. तर एक जागा तुतारी आणि पिपाणी या संभ्रमामुळे गेली. नाही तर १० पैकी ०९ जागा आल्या असत्या. असं म्हणत राष्ट्रवादी नेमकी कुणाची याचे उत्तर जनतेने त्यांच्या मतदानातून दिले आहे. विधानसभेतील स्ट्राईक रेटचा उल्लेख करत त्यांनी हाच फॉर्म्युला कायम राहण्याचे संकेत दिले.

हेही वाचा…शेकापच्या जयंत पाटलांना कॉंग्रेस अन् शरद पवार गटाचा पाठिंबा, परंतु ठाकरे गट…? 

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ? यावरून गदारोळ सुरू आहे. त्यावर देखील शरद पवारांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात लोकसभेप्रमाणचे विधानसभा निवडणुकीतही चित्र असेल. महाविकास आघाडी हाच चेहरा विधानसभा निवडणुकीतही असेल. आमचा चेहरा हा सामुदायिक आहे. असेही पवारांनी स्पष्ट केले.

READ ALSO :

हेही वाचा…“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका 

हेही वाचा…“जब चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने”, महायुतीच्या अर्थसंकल्पावर कॉंग्रेसची जबरी टिका

हेही वाचा..लेक लाडकी योजनेची अजित पवारांकडून घोषणा, महिलांना प्रतिमहिना मिळणार इतके रूपये 

हेही वाचा…पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले ? दबाव कोणी आणला ? आव्हाडांचे परखड सवाल, फडणवीसांनी दिलं हे उत्तर

हेही वाचा…पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले ? दबाव कोणी आणला ? आव्हाडांचे परखड सवाल, फडणवीसांनी दिलं हे उत्तर

Leave a Reply