IMPIMP
Sharad Pawar Vs Ajit Pawar Sharad Pawar Vs Ajit Pawar

“फक्त तोंडाने बोलून कोण ओरिजनल होत नसतं. ब्रँड हा ब्रँड असतो”, अजित पवार गटाला डिवचलं

मुंबई : संसदेच्या १८ व्या लोकसभा अध्यक्षपदी आज भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची पुन्हा निवड करण्यात आली. तर इंडिया आघाडीकडून विरोधी पक्षनेते पदी राहुल गांधी यांची निवड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची ओळख करून दिली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षाच्या अभिनंदन प्रस्तावर चर्चा करण्यात आली. यावेळी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी ओरिजन राष्ट्रवादी असा संसदेत उल्लेख केला. त्यावरून आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांना त्यांना टोला लगावला आहे.

लोकसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर सत्ताधारी पक्षांसह विरोधकांनी देखील अभिनंदन प्रस्तावर भाषण केलं. यावेळी सुनील तटकरे यांनी सभागृहात आम्ही ओरिजन राष्ट्रवादी असा उल्लेख केला. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला. यावरून आता ओरिजन पक्ष कोणता आहे ? हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं आहे. असा टोला जयंत पाटलांनी लगावला आहे.

यातच  फक्त तोंडाने बोलून कोण ओरिजनल होत नसतं. ब्रँड हा ब्रँड असतो. राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची अनेकांना इच्छा असली तरी बारामती आणि शिरुरच्या जनतेने ओरिजनल ब्रँडची ओळख दाखवून दिली. जर तुतारी वाजवणारा माणूस रायगडमध्ये उभा केला असता तर संसदेत मागच्या दाराने घुसण्याची वेळ आली असती.” अशी पोस्ट शरद पवार गटाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

राज्यातील पेपर फुटीपासून ते राज्य सरकारने केलेल्या अनेक अक्षम्य त्रुटींवर जाब विचारण्याचे काम अधिवेशनात महाविकास आघाडी करणार आहे. पीक विमा कंपन्यांची हजारो कोटी रूपये मिळवले पण शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. महाराष्ट्र सरकारचे हे अपयश आहे. सत्ता मिळवण्यासाठी ज्यांचा वापर झाला, असे अनेक कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत.असेही जयंत पाटलांनी सांगितलं आहे.

Leave a Reply