सिंधुदुर्ग : कृषी विधायकावरून भाजप नेते नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांच्या बाबत सूचक विधान केले आहे. ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं’ असे म्हणत त्यांनी या विधेयकाला राष्ट्रवादीचा विरोध नसल्याचे राणे म्हणाले आहेत
पत्रकार परिषेदत राणेंनी हे वक्तव्य केले आहे . तसेच कृषी विधेयकावरून त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. शेती आणि शिवसेनेचा कसलाही संबंध नाही. कृषी विधेयकावर संजय राऊतांनी तळ्यात मळ्यात भाषण केलं. त्यांच्या पक्षाला नेमकं कुठं जायचंय, त्यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे त्यांना हेच माहिती नाही, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला .
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल सभागृहात कृषी विधेयकावर बोलले पण त्यांनी या विधेयकाला कुठेही विरोध केला नाही, फक्त त्यांनी सभात्याग केला. मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो की एक घोषणा आहे ना… ‘ये अंदर की बात है’, त्याप्रमाणे ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं, असं नितेश म्हणाले.
Read Also
आधी तुकाराम मुंडेंना लॉकडाऊनवरून विरोध करणाऱ्या महापौरांकडूनच नागपुरात कडक लॉकडाऊनची मागणी https://t.co/3mECkdPepe @Tukaram_IndIAS @ngpnmc
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 25, 2020