पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं.मात्र पार्थ यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः व्यक्तव्य केलं आहे. माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. ते इममॅच्युअर आहेत. सीबीआय चौकशी कोणाला करायची असेल, तर माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला सीबीआय चौकशीची मागणी करायची असेल त्यासाठी कोणाचा विरोध नसावा.
शरद पवार यांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. परंतु शरद पवारांच्या वक्तव्यावर कोणतंही भाष्य करण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला. मला यावर काही बोलायचं नाही, असं पार्थ पवार यांनी सांगितलं.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून आता राष्ट्रवादीतील दिग्गज आणि तरुण नेते यांच्यात चांगलेच वाक युद्ध सुरु असल्याचे दिसून येते. तत्पूर्वी सुशांत सिंह यांच्या भावाने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानांबद्दल परिवाराची माफी मागावी अशी मागणी केली आहे.