IMPIMP
Sharad Pawar Sharad Pawar

‘ती’ स्थिती विधानसभेत झाली तर राज्यात सत्ता बदलणारच ; शरद पवारांनी सांगितलं राजकीय गणित

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार बाजी मारत महायुतीला चितपट केले आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढला आहे. यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत हीच लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशावेळी शरद पवारांनी लोकसभेच्या आकड्यांची गणित मांडून महाविकास आघाडीचीच सत्ता विधानसभेत येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घडवणार तीर्थदर्शन, शिंदेंकडून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची’ घोषणा 

शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करता २८८ पैकी १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे. त्याठिकाणी आमचे उमेदवार पुढे आहेत. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने एक इशारा दिला आहे. यात आमचे बहुमत आहे. लोकसभेचीच स्थिती विधानसभेलाही कायम राहायला काही हरकत नाही. अशी स्थिती विधानसभेत झाली तर इथे सत्ता बदलणारच आहे.

हेही वाचा..महाविकास आघाडीचा नवरदेव कोण ? कॉंग्रेस मात्र वऱ्हाडीच्या भूमिकेत, भाजपने डिवचलं 

दरम्यान, सध्या महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार ? यावरून वाद सुरू आहे. संजय राऊतांनी यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची मागणी केली आहे. तर शरद पवारांनी महाविकास आघाडीच सार्वजिनक चेहरा असून त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीत फटाके फुटू लागले आहेत.

READ ALSO :

हेही वाचा..पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांनी सुरू केल्या मोठ्या हालचाली 

हेही वाचा…“जितेंद्र आव्हाडांना अजितदादा नावाचा हळद्या रोग झालाय” 

हेही वाचा..“गरिब माता भगिणींना फाटक्या साड्या वाटून त्यावर ठिगळं लावून काही होणार नाही” 

हेही वाचा..विधान परिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांची यादी व्हायरल, बावनकुळेंनी केला मोठा खुलासा 

हेही वाचा..”मुख्यमंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार”, वडेट्टीवारांनी उघडकीस आणला परत एक घोटाळा

Leave a Reply