IMPIMP
Sharad Pawar, you will do politics for the rest of your life on the heels of Congress Sharad Pawar, you will do politics for the rest of your life on the heels of Congress

“शरद पवार तुम्ही काँग्रेसच्या कुबड्यांवर आयुष्यभर राजकारण केल”

मुंबई : शरद पवारांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. प्रचाराच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. त्यावर नरेंद्र मोदी यांनी मला भटकती आत्मा म्हटलं. परंतु आत्मा कायम असतो. हाच आत्मा तुमचा पाठलाग सोडणार नाही. असा इशाराच शरद पवारांनी मोदींना दिला. त्यावर आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं.

हेही वाचा..राज्यातील ‘सहा’ मंत्र्यांवर सोपविली विविध खात्याची जबाबदारी, वाचा सविस्तर 

शरद पवार तुम्ही काँग्रेसच्या कुबड्यांवर आयुष्यभर राजकारण केल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलताना आधी आपण स्वतःची कारकीर्द तपासून पहा. ६० वर्षांच्या इतक्या मोठ्या कारकिर्दीत एकदाही तुम्हाला स्वबळावर सत्तेत येता आले नाही. तुमच्या धरसोड वृतीला आणि गलिच्छ राजकारणाला कधीही जनतेने पसंत केले नाही. असं भाजपने म्हटलं आहे.

हेही वाचा..राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी मोहोळांकडे सहकार खाते, भाजप नेतृत्वाची महाराष्ट्रात मोठी खेळी 

४ वेळा मुख्यमंत्री बनून तुम्हाला एकदाही ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. पुलोद सरकार बनवून तुम्ही वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसलात, सोनिया गांधींना विरोध केला मात्र पुन्हा त्यांच्यासोबत आघाडी करून सत्तेत आलात. आयुष्भर तुम्ही शिवसेनेला विरोध केलात पण संधी दिसताच त्यांच्याबरोबर सत्तेत आलात. आणि आज तुम्ही इंडिया आघाडीतून अनेक कुबड्या आणि काठ्या एकत्र आणल्यात खोटा प्रचार केला मात्र जनतेने तुम्हाला पुन्हा एकदा नाकारले. असं म्हणत देखील भाजपने पवारांना डिवचलं आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होत आणि नेहमी राहील”, रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट 

हेही वाचा..“मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या,” अजितदादाच्या आमदाराची पत्राद्वारे मागणी 

हेही वाचा…“राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या”, सदाभाऊंची मोठी मागणी 

हेही वाचा..“सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनी “त्या” दोन अतृप्त आत्म्यांची शांती करायला हवी” 

हेही वाचा…कोण होणार लोकसभेचे अध्यक्ष ? आंध्र प्रदेशच्या ‘या’ महिलेची जोरदार चर्चा