IMPIMP
Hadapsar Vidhansabha Hadapsar Vidhansabha

हडपसरमध्ये शरद पवारांचा उमेदवार फिक्स, मात्र कॉंग्रेस अन् ठाकरे गटाने दावा ठोकल्यानंतर वाद चिघळणार

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप निवडणुक लढतील असे संकेत दिले होते. याला शरद पवारांचा देखील होकार असल्याचे समजत आहे. परंतु आता हडपसर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटासह कॉंग्रेसने देखील दावा सांगितल्याने महाविकास आघाडीत मोठी बिघाडी होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभेप्रमाणेच आता विधानसभा निवडणुक देखील महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. मात्र जागावाटपामध्ये तिन्ही पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. अशातच राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या हडपसर मतदारसंघावर ठाकरे गटासह कॉंग्रेसनेही निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याठिकाणी इच्छुक उमेदवार चांगलेच तयारीला लागले असून भावी आमदार २०२४ फिक्स अशा प्रकारच्या पोस्ट आणि बॅनर देखील सध्या पुण्यात झळकू लागले आहेत.

हेही वाचा..चित्रा वाघ यांची लागणार विधान परिषदेवर वर्णी, भाजपकडून हिरवा कंदील ? 

हडपसर विधानसभेच्या जागेवर शरद पवारांनी आपला उमेदवार फिक्स करून ठेवला आहे. परंतु कॉंग्रेसमधूनच नवाच वाद समोर येत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राहिलेले बाळासाहेब शिवरकर हे हडपसर मतदारसंघातून विधानसभा लढवण्यास इच्छूक असल्यामुळे हडपसरच्या जागेवर दावा करण्यासाठी दोन दिवसांपुर्वी त्यांनी एक बैठक घेतली होती. यामध्ये हडपसर कॉंग्रेस कमिटीचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा..तिघांचं भांडणं अन् चौथ्याचा लाभ ? जुन्नर विधानसभेची निवडणुक यंदा लक्ष्यवेधी ठरणार ? 

स्वत: इच्छूक असल्यामुळे शिवरकर म्हणाले की, हडपसरची जागा कॉंग्रेसला सुटावी अशी मागणी आपण वरिष्ठ नेत्यांकडे करू. तर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी तात्काळ बळीराम डोळे आणि इम्नान शेख यांची नावे पुढे केली. त्यामुळे शिवरकर यांची चांगलीच धांदल उडाली. त्याआधी हडपसर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ली आहे. याठिकाणी अनेक निष्ठावंत, शिवसैनिक असुन लोकसभेत याच सैनिकांनी खासदार अमोल कोल्हे यांना लीड मिळवून दिले होते. त्यामुळे या मतदारसंघात मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी दिला आहे.

महादेव बाबर यांनी देखील हडपसरमधून विधानसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. महादेव बाबर यांच्यासह माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी देखील याठिकाणी दावा ठोकला आहे. यातच या मतदारसंघात विद्यमान आमदार चेतन तुपे सध्या अजित पवार गटात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला येण्याची शक्यता आहे. परंतु दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनीही दावा सांगितल्याने हा पेच आणखीच वाढल्याचे दिसत आहे.

READ ALSO :

हेही वाचा…विधानसभेत पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरण बदलणार, शहरात इच्छुकांची मोठी भाऊगर्दी 

हेही वाचा…विधानसभेआधीच महायुतीत कुरबुरी अन् कटकटीची ठिणगी, पुण्यात राजकीय घडामोडींना वेग 

हेही वाचा..भाजपच्या सुर्यकांता पाटलांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले.. 

हेही वाचा..“त्यामुळेच संसदेत आज इंग्रजीत शपथ घेतली”, निलेश लंकेंनी दिली प्रतिक्रिया 

हेही वाचा..आधी राम मंदिराची गळती, आता बाणगंगेच्या पायऱ्यांची तोडफोड.. भाजप पराभवाचा सुड घेतोय ? 

Leave a Reply