IMPIMP
Sharad Pawar's name was covered for Modi's meeting, Sharad Pawar's group dissuaded Modi Sharad Pawar's name was covered for Modi's meeting, Sharad Pawar's group dissuaded Modi

मोदींच्या सभेसाठी शरद पवारांचं नाव झाकलं, शरद पवार गटाने मोदींना डिवचलं

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांच्यासाठी सभा होत आहे. परंतु ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. त्या शरद पवार पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला आता पोलिसांचे स्वरूप आले आहे. त्याआधी अनेक शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  यातच ज्याठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा पार पडत आहे. त्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिताला शरद पवार यांचं नाव आहे. यावरून आता शरद पवार गटातील पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावरून मोदींना डिवचलं आहे.

हेही वाचा…“मी एकटा बसतोय, ते तिघं येऊ द्या,” अन् आदित्य ठाकरेंनी दिलं मोठं चॅलेंज 

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ज्या ज्यावेळी नरेंद्र मोदी आले. त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर जोरदार टिका केली आहे. यावरूनच आज शेठजी ची याठिकाणी सभा होत आहे. सभेच्या ठिकाणांचं नाव आहे, शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती. आता इथेचं उभं राहून विचारायंच आहे, पवार साहेब ने क्या किया ? असा सवाल केलाय. तर कालपर्यंत दिसत आलेलं नाव आज झाकून टाकलं आहे. नाव झाकता येतं शेठ. पण कर्तृत्व कसं झाकणार असा खोचक सवाल देखील त्यांनी केलाय.

हेही वाचा…पुण्यात कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल, प्रकरण काय ?

दरम्यान, मोदी साहेब नाशिकमध्ये सभा घेणार आहेत म्हणून कांदा उत्पादकांना नोटीसा दिल्या जात आहेत.  काहींना तर अटकही करण्यात आली. निर्वीवाद सत्ता उपभोगणाऱ्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले असते तर कदाचित हि वेळ आली नसती. शिंदे साहेब ,फडणवीस साहेब ,अजित दादा यांच्यामध्ये हिंमत आणि शेतकऱ्याबद्दल कळवला असेल तर कांद्याची माळ घालून मोदिजींचे स्वागत करावे. असं म्हणून रोहित पवारांनी सरकारला डिवचलं आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“शिंदे, अन् अजितदादांनी कांद्याची माळ घालून मोदींचे स्वागत करावे” 

हेही वाचा…अजित पवार, शिंदे गटाला किती जागा मिळणार ? पृथ्वीराज चव्हाणांनी थेट आकडाच सांगितला 

हेही वाचा…अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली ? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर 

हेही वाचा..“नवमतदारांचं मत आम्हालाच,’ गुलाबराव पाटलांनी जळगावात ठोकला मोठा दावा 

हेही वाचा..“देशात मोदींची लाट नाही, मग मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी निवडणूक का केली ?” देवेंद्र फडणवीस म्हणाले…