पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राम मंदिर भूमिपूजनाबाबत कर्नाटक भाजपचे महासचिव यांनी एक पेंटिग शेअर केली आहे. ज्यावर काँग्रेस नेता शशी थरूर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे . या पेंटिगमध्ये पंतप्रधान मोदींची उंची भगवान रामाहून मोठी दाखवली आहे.
शशी थरुर यांनी ट्विट केले की, ना प्रेम शिकला, ना त्याग शिकला. करुणाही शिकली नाही, आपुलकीही शिकली नाही. स्वत: ला रामापेक्षा मोठे दाखणारे तुम्ही, श्री राम चरित मानसचा कोणता भाग शिकला आहात? त्यांनी यावर निशाणा साधल प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर भाजप नेता शोभा करांदलजे यांनी डॅमेज कंट्रोल करीत एक नवी पेंटिग शेअर केली. ज्यात भगवान राम यांना हत्तीवर आणि मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्यासोबत दाखविण्यात आले.
मात्र कर्नाटक भाजप नेत्या शोभा करंदलाजे यांनी ट्विट केलेल्या एका वादग्रस्त फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. शोभा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी हे प्रभू रामाचे बोट पकडून त्यांना मंदिराच्या दिशेने घेऊन जात आहेत. यात मोदींना मोठे तर प्रभू रामाला लहान बाळ असल्यासारखे दाखवले आहे. यावरून त्यांच्यावर चांगलीच टीका झाली. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी देखील या फोटोवरून त्यांच्यावर निशाणा साधला. श्रीरामचरित मानसमधील कोणता भाग शिकला ?, असा सवाल देखील त्यांनी केला.