पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदावर श्रीरंग बारणे यांनी पिंपळे सौदागरपर्यंत मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीत मार्गीची मागणी जोरपणे लावून धरली होती. त्यांच्या अथक परिश्रमाने आता पिंपळे सौदागरपर्यंत मेट्रोची सेवा विस्तारणार असून यामुळे पिंपळे सौदागर परिसराचा महत्वपुर्ण कायापालट झाल्याची प्रतिक्रिया उमटतांना दिसत आहे.
हेही वाचा..“मावळच्या विकासात खासदार बारणे यांचा सिंहाचा वाटा” , नितीन गडकरींची बारणेंसाठी सभा
शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे-आरपीआय-आरएसपी आणि इतर मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा देण्यासाठी हॉटेल शिवार गार्डन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पिंपळे सौदागर येथील विविध गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल नाना काटे तसेच माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत दिलेल्या भरीव निधीमुळे पिंपळे सौदागर परिसरात झालेल्या महत्वपूर्ण विकासकामांवर श्रीरंग बारणे यांनी भाष्य केलं.
यावेळी बोलतांना श्रीरंग बारणे म्हणाले की, पुढील टप्प्यात वाकड ते चाकण या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याची योजना आहे. हा मार्ग पिंपळे सौदागरमधून जात असल्याने रहिवासी लोकलमधील कनेक्टिव्हिटी आणि गतिशीलता वाढविण्यासाठी मेट्रो सुविधांचा विस्तार करण्याची अपेक्षा करू शकतात. देहू रोड आणि बालेवाडी दरम्यान साडेआठ किलोमीटर लांबीचा उड्डाणपुल बांधण्याच्या योजनांसह, देहू रोड कात्रज बायपास रोडमध्ये एक महत्वपुर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणार आहोत. यासाठी ६,६०० कोटी रूपये खर्च करून बांधण्यात येणार हा प्रकल्प किवळे, रावेत, पुनावळे आणि वाकड यांसारख्या भागातील वाहतूक कोंडी दुर करण्याचा उद्देश अशल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय, बारणे यांनी मतदारसंघात गेल्या दशकभरात केलेल्या विविध विकासाच्या प्रयत्नांची माहिती दिली. तर नाना काटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेृतृत्व देशासाठी सक्षम असून देश सुरक्षित ठेवण्यासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी श्रीरंग बारणे यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. तर प्रशांत शितोळे यांनी बारणे यांच्या मोठा लोकांचा पाठिंबा मिळत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…“मावळात संजोग वाघेरेंना घरातूनच विरोध, भावकीतल्या संदीप वाघेरेंनी दिली तिखट प्रतिक्रिया”
हेही वाचा..“सुप्रियाताई चतुर्थीला अन् अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात”, मिटकरींचा जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“श्रीरंग बारणे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार”, महादेव जानकरांना मोठा विश्वास