पुणे : बारामती मतदारसंघानंतर आता राज्यात मावळ लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे.मावळ मतदारसंघ आणि पिंपरी-चिंचवड येथे नातेसंबंधाचा नेहमीच दबदबा राहिला आहे. अशात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना त्यांच्याच नातेवाईकांनी विरोध केल्याने राजकीय वर्तुळात सध्या याचीच चर्चा रंगली आहे. संजोग वाघेरे यांना भावकीमधील संदीप वाघेरे विरोध केलाय. संदीप वाघेरे हे भाजपचे नगरसेवक असून त्यांनी आपल्याच नातेवाईक असलेल्या मविआचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यावर टीका केली आहे.
संदीप वाघेरे यांनी सगळंच काढलं पिंपरी गावातील मूलभूत प्रश्न सोडविता आले नाही आणि आता त्यांना मावळचे खासदार होण्याचे डोहाळे लागले आहेत, असा टोला संदीप वाघेरे यांनी लगावला आहे. महायुतीच्या कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात संदीप वाघेरे यांनी संजोग वाघेरे यांच्यावर निशाणा साधला. गेल्या पंधरा-वीस वर्षांत पिंपरी गावात विकासाचा देखील दिसला नसल्याचं यावेळी संदीप वाघेरे यांनी पटवून दिलं. पुढे त्यांनी संजोग वाघेरे यांच्यावर धक्कादायक आरोप देखील केले. त्यामुळे संदीप वाघेरे हे आता चर्चेत आले आहेत.
हेही वाचा…‘घर चलो’ अभियानातून भाजपा कार्यकर्ते दहा लाख घरात पोहोचणार !
महापालिकेमध्ये ठेकेदारी करून स्वतःचे घर भरले, त्यांना आता याच पद्धतीने खासदार बनून घर भरायचे आहे काय?, आता कशाला खासदार व्हायचंय?, असा संतप्त सवाल संदीप वाघेरे यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर थेट परिवार वाद काढत संदीप वाघेरे यांनी संजोग वाघेरे यांच्यावर हल्लाबोल केला.
संजोग वाघेरे यांच्या कुटुंबात कायमच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने वेळोवेळी अनेक पद होती. त्यांचे दिवंगत वडील भिकू वाघेरे पाटील हे महापौर होते. त्याचबरोबर संजोग वाघेरे यांनीदेखील महापैरपद भूषविले आाहे. त्यानंतर त्यांच्या पत्नीदेखील स्थायी समिती सदस्या होत्या.एवढी मोठी पदे घरात असतानादेखील पिंपरी गावाला जुन्या पुणे-मुंबई महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रेल्वे लाईनवरील उड्डाणपूल संजोग वाघेरे यांना बांधता आला नाही. अशी टीका संदीप वाघेरे यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“सुप्रियाताई चतुर्थीला अन् अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात”, मिटकरींचा जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“श्रीरंग बारणे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार”, महादेव जानकरांना मोठा विश्वास
हेही वाचा..“मावळच्या विकासात खासदार बारणे यांचा सिंहाचा वाटा” , नितीन गडकरींची बारणेंसाठी सभा