IMPIMP
Shelar's discussion with Raj Thackeray, will Abhijit Panse withdraw his candidature Shelar's discussion with Raj Thackeray, will Abhijit Panse withdraw his candidature

शेलारांची राज ठाकरेंसोबत चर्चा, अभिजित पानसे उमेदवारी मागे घेणार का ? दिलं हे उत्तर

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यातच भाजपची जागा असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेने उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीत संभ्रम निर्माण झाला आहे. यातच भाजपचे मुंबई शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावर आता मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

हेही वाचा..“राज्यसभा सोडा, लोकसभेची उमेदवारी मी नाकारली”, नाराजीच्या चर्चेवर भुजबळांचं पुर्णविराम 

कोकण पदधीवर मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार निरंजन डावखरे आहेत. ते देखील पुन्हा या निवडणुकीसाठी इच्छूक होते. मात्र मनसेने त्याठिकाणी अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर केल्याने थोडा संभ्रम निर्माण झाला. यातच आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अभिजित पानसे आपली उमेदवारी मागे घेणार का ? अशी चर्चा सुरू आहे.

हेही वाचा…घोंचू..! “मोदी खरोखरच देव आहेत, मग ते ध्यान कुणासाठी करतात ?” 

दरम्यान, आमचा पक्ष हा आदेशावर चालतो, राज साहेबांनी एकदा सांगितलं की महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरतो. आता राज साहेबांना तयारीची अपडेट देण्यासाठी आलो होतो. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहे, संपूर्ण पक्षामध्ये सकारात्मक वातावरण आहे. गेली वर्षभर आम्ही नोंदणी करत आहोत, त्यामुळे आमचा विजय आम्ही निश्चित समजतो. आशिष शेलार यांच्यावर मी बोलण्याची योग्यता नाही ते मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यात आणि राज साहेब यांच्यात काही चर्चा झाली असेल मला माहित नाही. पण, एक नक्की आहे की ही निवडणूक भाजपा लढवेल किंवा शिवसेना लढवेल. आमची उमेदवारी आम्ही आधी जाहीर केली होती. आम्ही गेली वर्षभर यावर काम करत आहे, त्यामुळे आम्ही यावर ठाम आहे. अशी प्रतिक्रिया अभिजित पानसे यांनी दिलीय.

READ ALSO :

हेही वाचा…“०४ जून च्या नंतर अजित दादांची नौका बुडणार”, शरद पवार गटाचा खोचक टोला 

हेही वाचा..“भुजबळांनी आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजे होते”, अजित पवार गटाच्या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली

हेही वाचा…दानवेंच्या कार्यकर्त्यांनी कुंभार कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप :जमिनीसाठी घर पाडले, संसार उघड्यावर; वडेट्टीवार पीडितांच्या भेटीला 

हेही वाचा..1 शेळ्या, 3 म्हशी, 21 काळ्या मेंढ्या आणि 5 डुकरांचा बळी ! काँग्रेस सरकार पाडण्यासाठी काळी जादू 

हेही वाचा..मोठी बातमी…! मनोज जरांगेंच्या अटक वॉरंट प्रकरणात पुणे कोर्टाचा मोठा निर्णय