IMPIMP
Shinde, and Ajit Dada should welcome Modi with garlands of onions Shinde, and Ajit Dada should welcome Modi with garlands of onions

“शिंदे, अन् अजितदादांनी कांद्याची माळ घालून मोदींचे स्वागत करावे”

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडणार आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी कालच काही जणांना ताब्यात घेतलं आहे. तर नाशिक येथील पिंपगावताली काही शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आलीय. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केलीय.

हेही वाचा…पुण्यात कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल, प्रकरण काय ?

मोदी साहेब नाशिकमध्ये सभा घेणार आहेत म्हणून कांदा उत्पादकांना नोटीसा दिल्या जात आहेत.  काहींना तर अटकही करण्यात आली. निर्वीवाद सत्ता उपभोगणाऱ्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले असते तर कदाचित हि वेळ आली नसती. शिंदे साहेब ,फडणवीस साहेब ,अजित दादा यांच्यामध्ये हिंमत आणि शेतकऱ्याबद्दल कळवला असेल तर कांद्याची माळ घालून मोदिजींचे स्वागत करावे. असं म्हणून रोहित पवारांनी सरकारला डिवचलं आहे.

हेही वाचा..“मुख्यमंत्र्यांकडून अपघाताची जबाबदारी झटकण्याचा पळकुटेपणा आम्हाला मान्य नाही”, वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल

दरम्यान, अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिरेटोप देऊन सत्कार करण्यात आला होता. त्यावरूनही रोहित पवारांनी डिवचलं आहे. गरज पडली तर प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते मोदी यांचे स्वागत करावे. राज्यातले नेते फुसके बार असले तरी मोदी साहेबांची कांद्याच्या प्रश्नापासून दूर पळण्याची इच्छा असली तरी महाराष्ट्राला उध्वस्त झालेला शेतकरी बघून मोदी साहेबांचा टेलिप्रॉम्टर तरी कांद्याबद्दल एखादा शब्द बोलेल असेही रोहित पवारांनी म्हटलंय.

READ ALSO :

हेही वाचा…अजित पवार, शिंदे गटाला किती जागा मिळणार ? पृथ्वीराज चव्हाणांनी थेट आकडाच सांगितला 

हेही वाचा…अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली ? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर 

हेही वाचा..“नवमतदारांचं मत आम्हालाच,’ गुलाबराव पाटलांनी जळगावात ठोकला मोठा दावा 

हेही वाचा..“देशात मोदींची लाट नाही, मग मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी निवडणूक का केली ?” देवेंद्र फडणवीस म्हणाले…

हेही वाचा…“मी एकटा बसतोय, ते तिघं येऊ द्या,” अन् आदित्य ठाकरेंनी दिलं मोठं चॅलेंज