मुंबई : देशासह राज्यात कोरोना व्हायरसचे संकट आहे. या संकटाचा परिणाम दसऱ्यावर देखील पाहण्यास मिळत आहे. दरवर्षी भव्यरित्या पार पडणाऱ्या शिवसेनेचा दसरा मेळावा देखील यंदा मर्यादित लोकांच्या उपस्थितीतच पार पडणार आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हा मेळावा वीर सावरकर सभागृहात होणार आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. हा मेळावा सायंकाळी 6.30 वाजता होणार असून, सोशल मीडियावर याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. सोशल मीडियावरून शिवसैनिक उद्धव ठाकरेंना संबोधित करताना पाहू शकतील.
वीर सावरकर सभागृहात मेळाव्यादरम्यान सर्व कोरोना नियमावलीचे पालन केले जाणार असून, नियमाप्रमाणे केवळ 50 जणच उपस्थित राहतील. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेस दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या असून कोरोनारूपी रावणाचा वध करू या असे आवाहन त्यांनी के ले आहे.