मुंबई : ‘ती माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे. तिनं त्याच भूमिकेत राहावं. आम्हाला हिंदुत्वाचे धडे देऊ नयेत. शिवसेनेची राजकारणातली ही चौथी पिढी आहे. उगाच प्राणी वगैरे म्हणून टीका करू नका. आम्ही संस्कृती जपतोय. आम्ही जर तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही,’ असं प्रत्युत्तर शिवसेनेनं अमृता फडणवीस यांना दिलं आहे.
मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात लेटरवॉर सुरू झाल्यानं राजकारण तापलं. यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या. या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल रात्री उशिरा ट्विट करत उडी घेतली. अमृता यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यानंतर आता अमृता यांना शिवसेनेच्या महिला आघाडीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ट्विटरवरून नको, समोर येऊन बोला, असं थेट आव्हान शिवसेनेकडून अमृता फडणवीस यांना देण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी अमृता यांचा एकेरी उल्लेख करत शरसंधान साधलं. ‘ती कोण आहे ? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का ? ती कधी राजकारणात आली ? नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर ती बोलू लागली,’ असं राऊत म्हणाल्या.
मंदिरं खुली करण्याबद्दल काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस ?
‘वाह प्रशासन! बार आणि दारूची दुकानं सुरू आहेत. मग मंदिरं डेंजर झोन आहेत का? काही जण नियमावली लागू करण्यात असमर्थ ठरतात, त्यावेळी त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते,’ अशा खोचक शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
वाह प्रशासन – bars and liquor shops are wild wide open but temples are danger zones ?
Definitely sometimes ‘certificate’ is required to prove the saneness of some dicey creatures who are incapable of having SOPs in place ! 🤔🙄 #Maharashtra— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 13, 2020
Read Also
…आणि मुंबईच्या महापौरच स्वतःच्या दालनाबाहेर बसल्या ठिय्या आंदोलन करायलाhttps://t.co/KrybnxGDtq#KishoriPedhnekar #BMC #Shivsena @KishoriPednekar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 14, 2020