बुलढाणा: कोरोना लाटेमुळे दिवसेंदिवस रुग्णांचे हाल होताना दिसून येत आहेत. कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा सगळीकडेच तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.त्यात या इंजेक्शनचा काळाबाजार पण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात पण या इंजेक्शनचा काळाबाजार होताना दिसून येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पण आता संताप व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्ह्यात पण रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळताना त्याच्या तुटवड्याच्या सामना करावा लागत आहे. इंजेक्शन न मिळाल्यामुळे रुग्णांच्या मृत्यूत पण मोठ्या दिसून आले आहे.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे की,”एकीकडे रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शनसाठी धावपळ करत असताना इंजेक्शन मिळत नाही. मात्र एजंटांकडे इंजेक्शन उपलध आहे. हा रुग्णांच्या टाळूवरचे लोणी खायचा प्रकार असून बाहेरून इंजेक्शन कसे मिळतात मला दाखवा मी त्यासाठी १ कोटी रुपये द्यायला तयार आहे. मी इंजेक्शन घेतो आणि रुग्णांना मोफत देतो. त्यामुळे रुग्णांचे प्राण तरी वाचतील.
संजय गायकवाड यांनी यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर विखारी टीका केली होती
मध्यंतरी संजय गावकवाड यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर विखारी टीका केली होती. त्यानंतर संजय गायकवाड हे प्रकाश झोतात आले होते. ‘देवेंद्र फडणवीस यांनाच तळीराम पाळायची सवय असून लेडीज बारमध्ये त्यांच्या जवळचे मंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जातात’, असे जोरादर प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी फडणवीसांना दिले आहे. तसेच फडणवीसांनी मला सल्ला द्यायची गरज नाही, त्यांनी केंद्राला सल्ला द्यावा, असा टोला देखील संजय गायकवाड यांनी लगावला आहे.
हे पण वाचा
संजय गायकवाडांचे फडणवीसांना प्रत्युत्तर