मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली. मुंबईतील हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. संजय राऊत यांनी मात्र या भेटीचा इन्कार केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांची पांढऱ्या रंगाची गाडी या हॉटेलमधून बाहेर पडताना दिसली आहे.
दोनीही नेत्यांमध्ये दुपारी दीड ते साडेतीन पर्यंत चर्चा झाली या दोघांच्या भेटीच्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात आहे. संजय राऊत यांनी भेट झाली नसल्याचा दावा केला आहे. ग्रँड हयात हॉटेल सांताक्रुझ वाकोला येथे गुप्त बैठक झाली असल्याचे आता समोर आले आहे.
संजय राऊतांकडून नकार
संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. मात्र, वृत्तवाहिनीच्या रिपोर्टरने जेव्हा त्यांना तपशीलवार माहिती दिली. तेव्हा, राऊत यांनी आपण हॉटेलमध्ये होतो. पण फडणवीस यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. फडणवीस अन्य कुणाला तरी भेटायला आले असतील त्याची मला माहिती नाही, असं राऊत यांनी सांगितलं.
Read Also
सतत टीका करणाऱ्या नितेश राणे यांना अखेर शिवसेनेकडून जोरदार उत्तरhttps://t.co/JsZzkidouA#NiteshRane #Shivsena #BJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 26, 2020