मुंबई : पुण्यात एक पत्रकार परिषद आयोजित करून शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि भाजप नेत्यांना धारेवर धरत जोरदार टीका केली होती, पण आता त्या टीकांना प्रत्युत्तर म्हणून भाजप नेते निलेश राणेंनी एक ट्विट करत संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.
शिवसेनेतल्या एका रंगीला मुळे शिवसेनेची उलटी दौड सुरू झाली… संज्याचा पुढचा चित्रपट ‘एक शिवसेना थी’, असं ट्विट करत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे. काल मी बोललो होतो ते खरं ठरलं. जुने शिवसैनिक जर ह्या क्षणाला जागले नाहीत तर ते स्वतःचं वाटोळं करून घेतील… नंतर कोणाला दोष देऊन उपयोग नसतो. जय महाराष्ट्र,असं हि म्हणत त्यांनी शिवसेनेला धारेवर धरलं आहे.
शिवसेनेतल्या एका रंगीला मुळे शिवसेनेची उलटी दौड सुरू झाली… संज्याचा पुढचा चित्रपट 'एक शिवसेना थी' |
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 1, 2020
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही त्यामुळे महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले आहे.
आमचं हिंदुत्व राजकीय नाही, घंटा बडवली अने शेंडी ठेवली म्हणजे हिंदुत्व नाही. शिवसेनेची चळवळ मराठी माणसाची जोडली आहे. आम्ही राजकारणात पदं मिळावी म्हणून आलो नाही, ही चळवळ वाढली पाहिजे, महाराष्ट्राच्या गावागावात पोहचली पाहिजे यासाठी आम्ही काम केले. शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये, आजही आक्रमकपणे आम्ही हिंदुत्व मांडतो असा घणाघात देखील यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत हे पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापासाठी पुण्यात आले होते. राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार हे स्थिर असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचं वक्तव्य परभणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं आहे.
त्याबद्दल खासदार संजय राऊत यांना विचारलं असता नांदेड महापालिकेचा विषय असेल तर स्वतः मुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष घालतील असं म्हटलं आणि काँग्रेसच्या मजबूत पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सरकार उभा असल्याचं सांगितलं होत.
Read Also ;
माजी मंत्री गिरीश महाजनांच्या गाडीवर दगडफेक, भाजपात खळबळ https://t.co/S5yuwzmZqW @girishdmahajan
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 31, 2020