मुंबई : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा भाजप आणि मित्रपक्ष जनता दल युनाइटेडने जाहीर केला असून त्यामध्ये बिहार विधानसभा निवडणूक जर भाजप आणि मित्रपक्ष जिंकले तर आम्ही संपूर्ण बिहारमध्ये मोफत कोरोना लस देऊ असं आश्वासन देण्यात आहे आहे.
आता यावरून भाजपला मोठ्या प्रमाणात टीकेला समोर जावं लागत आहे. जर निवडणूक असेल तरच तुम्ही लस देणार का? आणि जी राज्ये बिगरभाजप शासित आहेत तिथल्या सरकारांनी काय रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिनकडून लस मागवायची का? असा खोचक सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे.
पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा, पंजाब, राजस्थान अशा राज्यात भाजप विचारांची सरकारे नाहीत. त्यांनाही ‘लस’ देण्याबाबत केंद्र सरकार हात आखडता घेणार काय? या राज्यांतील सरकारांनी पुतीनकडून लस मागवायची काय?” असा सवाल शिवसेनेन उपस्थित केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे. यावरुन शिवसेनेनं केंद्रावर टीका केली आहे.
Read Also :
बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे असं बोलल्यावर माझ्यावर चौकश्या लावल्या : एकनाथ खडसेhttps://t.co/GNAq7MTF22 @EknathGKhadse @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 24, 2020