IMPIMP
mahadev jankar vs pankaja munde mahadev jankar vs pankaja munde

“बहिणीला विधानपरिषद मिळाली, आता भावाला देखील राज्यसभा मिळणार”

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून सातत्याने डावलण्यात येणाऱ्या पंकजा मुंडे यांना भाजपने आता विधान परिषदेची संधी दिली आहे. त्यावरून आता पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. यातच मित्र पक्ष असलेल्या रासपच्या महादेव जानकर यांचा पत्ता कट करण्यात आला. यानंतर महादेव जानकर यांना राज्यसभेवर घेतलं जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आता महादेव जानकर यांनी मोठं भाष्य केलं आहे.

हेही वाचा..पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला गळती सुरूच, अजित पवारांनी आणखी एक धक्का 

महादेव जानकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि गेल्या २० वर्षांपासून घरगुती संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस हे माझ्या भावाप्रमाणे आहेत. मी त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. त्यामुळे माझा स्वभाव त्यांना माहिती आहे. त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. आज मुंबईतील रासपच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शइंदे हे देखील येणार होते. मात्र काही नियोजित कामांमुळे ते येऊ शकले नाहीत. महायुतीमधील तीन्ही नेत्यांनी माझ्या पक्षाला एक जागा लोकसभेला दिली. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. जनतेनं कौल दिला. त्यामध्ये माझा पराभव झाला. मी पराभव मान्य केला आहे.

हेही वाचा…पर्वतीमध्ये भाजपच्या नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच, श्रीनाथ भिमाले की माधुरी मिसाळ ? एकच चर्चा

दरम्यान, बहिणीला विधानपरिषद मिळाली. आता भावाला राज्यसभा मिळणार का ? असा प्रश्न केला असता. त्यावर ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. बहिण विधानपरिषदेवर आमदार झाल्यानंतर भाऊ देखील राज्यसभेवर नक्कीच जाईल. काळजी नाही. असेही त्यांनी सांगितलं.

READ ALSO :

हेही वाचा..“प्राधिकरणाच्या मालमत्ता होणार फ्री होल्ड ;” महेश लांडगे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर सामंताचं उत्तर 

हेही वाचा…“सभागृहात उद्यापासून त्याच आक्रमकतेने …” अंबादास दानवेंचं निलंबन मागे 

हेही वाचा…वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश , विधानसभेसाठी ठाकरेंकडे मोरेंनी दिलेल्या दोन पर्यायात इच्छूकांची प्रचंड गर्दी 

हेही वाचा..इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, अजित पवार गट काय भूमिका घेणार ? 

हेही वाचा..शिंदे अन् ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त भेट, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ 

 

Leave a Reply