IMPIMP

जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ आघाडीवर, करण पवार पिछाडीवर

मुंबई : धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. शोभा बच्छाव आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. 11 व्या फेरीमध्ये काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांची मुसंडी मारली आहे. बच्छाव यांनी भाजपाचा 12 हजार मतांचा लीड तोडत 12 हजार मतांनी घेतली आघाडी घेतली आहे.

जळगाव मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ यांनी मोठी आघाडी घेतली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्या वर त्यांनी १३४१३५ मतांची आघाडी घेतली आहे. स्मिता वाघ यांना आतापर्यंत ३१९८७१ मत पडली आहेत. तर करण पवार यांना १८५७३६ मत पडली आहेत.

तर कल्याण लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या वेळी तीन विधानसभेच्या चार ईव्हीएम मशीनमध्ये झाला तांत्रिक बिघाड झाला आहे. आकडेवारी दाखवत नसल्याने व्हीव्हीपॅट मधील मतपत्रिका मोजल्या जाणार आहेत.