IMPIMP
So what exactly is this minister doing? Opposition is targeting the government So what exactly is this minister doing? Opposition is targeting the government

“तर हे मंत्री नेमके कोणते उद्योग करतात? विरोधकांचा सरकारवर निशाणा

पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील गेल्या १० वर्षांपासून कंपन्या बाहेर पडत आहेत. या माहिती-तंत्रज्ञान पार्कमधील पायाभूत सुविधांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. याचबरोबर वाहतूक कोंडी वाढल्याने कंपन्या आयटी पार्कमधून बाहेर पडून स्थलांतरित होत आहेत. यामुळे रोजगारालाही मोठा फटका बसत असून हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशने गेल्या १० वर्षा ३७ कंपन्या बाहेर गेल्याचा दावा केलाय. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.

हेही वाचा..“गृहमंत्र्यांचं पुण्यासारख्या महत्वाच्या शहराकडे लक्ष नाही”,सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टिका 

महाराष्ट्राच्या हक्काचे रोजगार एकामागून एक बाहेर जात असताना राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यापुर्वीही महत्वाचे उद्योग बाहेर गेले, तरुणांच्या हक्काचा रोजगार हिरावून घेतला गेला. परंतु सरकारला याबाबतीत लक्ष घालायला वेळ नाही. आता पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याचे समोर आले आहे. एक उद्योग बाहेर जातो तेंव्हा त्यासोबत रोजगार आणि तरुणांचे भविष्य देखील संकटात येतात. महाराष्ट्रातील तरुणाई रोजगाराच्या शोधासाठी पायपीट करीत असून या परिस्थितीला उद्योग टिकवून ठेवण्याबाबत निष्काळजी असणारे हे शासन कारणीभूत आहे. अशी टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय.

हेही वाचा..भाजपच्या जागेवर अजित पवार गटाने जाहीर केला उमेदवार, विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीत संघर्ष वाढणार 

तर आदरणीय पवार साहेबांनी हिंजवडीत IT पार्क उभं करुन देशभरातील लाखो युवांना लाखो रुपयांच्या पॅकेजची सोय केली. पण आज इथल्या तब्बल ३७ कंपन्या आपली पॅकिंग करुन बाहेर गेल्या तरी उद्योगमंत्र्यांना याची माहिती नसेल तर हे मंत्री नेमके कोणते उद्योग करतात? ‘विचारां’साठी आणि ‘विकासा’साठी काम करतो म्हणणाऱ्या या सरकारचा हाच का विचार आणि विकास? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

READ ALSO :

हेही वाचा..नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणुक रंजक होणार, ठाकरे अन् शिंदें आमनेसामने

हेही वाचा…देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतलं रामललांचे दर्शन 

हेही वाचा..“..तर विशाल अग्रवालला वाचवणारी सगळी नावं समोर येतील”, पुणे अपघाताबाबत मोठी अपडेट समोर 

हेही वाचा.. पोर्श कारअपघात प्रकरणी सुनील टिंगेर अडचणीत, जगदीश मुळीकांची प्रकरणावर चुप्पी का ? 

 हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमधील शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अक्षरश: झापले ! प्रकरण काय ?