सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सुझान वॉकर ( या परदेशी थेरपिस्टचे नाव समोर आले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूचा निष्कर्ष काढला, असा आरोप करत भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलीस, सीबीआय, ईडी किंवा आयकर विभागाने वॉकर यांची चौकशी करण्याचे गरजेचे असल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे. वॉकर यांनी मेंटल हेल्थ कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना पत्र देखील लिहिले आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी अॅड. आशिष शेलार यांनी या पत्राद्वारे केली आहे.
वॉकर यांनी सुशांतची माहिती कायद्याचे उल्लंघन करत मीडियाकडे उघड का केली असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. ‘सुझान वॉकर यांच्या म्हणण्यानुसार जर पोलीस म्हणत असतील की सुशांतने आत्महत्या केली आहे तर काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत’, असा आरोप शेलार यांनी केला आहे. त्या परदेशी असताना भारतामध्ये मेंटल हेल्थ संदर्भात प्रॅक्टिस करण्याची परवानगी वॉकर यांच्याकडे आहे का, असा सवाल देखील शेलार यांनी उपस्थित केला आहे.